shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केजमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचा ठाकरेंच्या शिवसेऩेकडुन निदर्शने करून जाहीर निषेध!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिनांक 17/2/2023 रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल देऊन घटना व संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे.  


सदरील निकाल निष्ठावंत शिवसैनिकांना मान्य नसुन केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने चुकीचा निकाल शिवसैनिकांवर लादल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केज येथे संपर्क नेते मा. चंद्रकांत खैरे ,उपनेत्या सुषमाताई अंधारे, संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील, सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयासमोर दिनांक 20/2/2023 रोजी निदर्शने करून तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करण्यात आला .

यावेळी विधानसभा प्रमुख अशोक जाधव, जिल्हा संघटक अभिमान बापु पटाईत ,युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात ,जिल्हा कक्ष अधिकारी किशोर घुले, शहर प्रमुख तात्या रोडे, महिला आघाडी तालुका प्रमुख अश्विनीताई बडे  ,सचिव रामहरी कोल्हे, असरफ शेख , युवा सेना सचिव अनिल ठोंबरे, सुभाष ठोंबरे ,ज्योतीकात कलसकर, अमोल चौधरी ,उपशहरप्रमुख पपु ढगे ,लहु वाघमारे ,आतम घाडगे, बाबा घाडगे ,गणेश निगुळे, सखाराम वायबसे ,शहादेव भोसले ,राम गवळी, राहुल अंधारे, पिटु भैरट ,प्रतिक नखाते सह निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
close