प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केज तालुक्यातील सोनीजवळा येथे मुस्लिम मावळा
ग्रा.प.सदस्य मिनाज पटेल व मुस्लिम समाजाच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचा प्रारंभ सोनीजवळा गावचे सरपंच गोविंद ससाणे, उपसरपंच बाळासाहेब कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला .
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.
त्यांनी जात,पंथ,धर्म असा भेदभाव कधी मानला नाही.अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली.यामध्ये मुस्लिम समाज बांधवांचा देखील वाटा होता.त्यांनी अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम व्यक्तींकडे मोठ्या विश्वासाने सोपवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा-समाजात कधी दुरावा व तेढ निर्माण होणार नसून, सत्ताधार्यांनी देखील शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन त्यांच्या विचार अंगीकारण्याची गरज असल्याची भावना मिनाज पटेल यांनी व्यक्त केली.
यावेळी मुकुंद गायकवाड (ग्रा.प.सदस्य) साहेबराव भंडारे(मावळा ग्रुप),वरपे साहेब (ग्रामसेवक),दशरथ चवरे(पत्रकार),देविदास जोगदंड(ग्रा.प. सदस्य),प्रताप वैरागे (ग्रा.प.सदस्य),अरुण पटेकर( ग्रामरोजगर सेवक).दादा वैरागे,जिलानी शेख,हुसेन पटेल, खुददुस शेख,सत्तर शेख,सत्तर पठाण,मोहमद शेख,चक्कु पटेल,अरबाज पठाण,लुकमान शेख,मौला पठाण,इसाक शेख,पप्पू शेख,आसेफ पठाण,हसन पटेल,अमर शेख,तय्याब पठाण सह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

