shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयातर्फे हार्मोनी इंटरनॅशनल स्कूल येथे स्वच्छ मुख अभियान संपन्न


प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : ८ /   वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथिल यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयातर्फे दि.८ फेब्रुवारी २०२३ रोजी हार्मोनी इंटरनॅशनल स्कूल, वडगांव गुप्ता येथे 'स्वच्छ मुख अभियान' संपन्न झाले.

५ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र सरकारतर्फे मौखिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. विद्यार्थ्याच्या मौखिक आरोग्यासंबंधी जनजागृती करून त्यांचे दात, मुख आरोग्य उत्तम राखणे आणि संपूर्ण शरिरस्वास्थ्य सुदृढ राखणे हा या अभियानाचा मुख्य उददेश आहे. त्यानिमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. निलिमा राजहंस यांचेकडून विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्हे देण्यात आली. यामध्ये निबंध स्पर्धेत - सुयश आडसुरे प्रथम, आयुषी मेटर- व्दितीय, आर्या चोरगे- तृतीय, चित्रकला स्पर्धेत- अंकिता खाकाळ प्रथम, सुयोग पाटील. व्दितीय श्रेया आंग्रज तृतीय यांनी बक्षिसे मिळविली. सदर स्पधांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयाच्या सामाजिक दंत विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियांतर्गत शाळेतील इ. ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांच्या दातांना Topical Fluoride Gel Application करण्यात आले. इ. १ ली ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्याची तपासणी करण्यात आली व मौखिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. निलिमा राजहंस, हार्मोनी स्कूलचे प्राचार्य अशोक बेरड, महाविद्यालयाच्या सामाजिक दंत विभागप्रमुख डॉ. निखिल बॉबले, डॉ. सुप्रिया व्यवहारे, बालदंत विभाग डॉ. शैली शेळके व आंतरवासिता विद्यार्थी, स्कूलचे अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
close