आ. नमीताताई मुंदडा यांनी कपिल मस्के च्या तक्रारीची दखल घेत केला अतारांकित प्रश्न उपस्थित
अपर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांचा तो अदला बदलीचा निर्णय अपर विभागीय आयुक्ता कडून अखेर रद्दबातल
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी;-
केज येथील सरकारी गायरान जमिनीची अदला बदली करून त्याचे अकृषिक करणे व अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे नोंदी घेणे तसेच या अदला बदली संदर्भात अपर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला अदला बदलीचा निर्णय अपर विभागीय आयुक्ताकडून अखेर रद्दबातल ठरवला गेला असल्याने आता केज मधील भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
या बाबतची माहिती अशी की, किसन अमृत लांडगे यांच्या नावे केज येथील सरकारी गायरान सर्व्हे नंबर ३०/१ मधील २, हेक्टर जमीन ही अतिक्रमण केलेली होती. सदर जमीन ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानसाठी देण्यासाठी सचिव शेषेराव कसबे यांनी अर्ज केला होता .परंतु या प्रकरणी दि. जिल्हाधिकारी बीड यांच्या दि, १८/२/२०११ च्या आदेशानुसार दि. १८/३/२०११ किसन लांडगे हे वर्ग २ चे मालक म्हणून नोंद घेण्यात आली.
तसेच उमर फारोकी याने दि. ९/१२/२०१४ रोजी येवता येथे सर्व्हे नंबर ७८ मध्ये २.५९८ हे आर जमीन खरेदी केली.
उमर फारोकी आणि किसन अमृत लांडगे यांची सर्व्हे नंबर ३०/१ आणि सर्व्हे नंबर ७८ मधील जमीन ही लगट नसतानाही त्या दोघांनी दि. २/१/२०१५ रोजी आपसात अदला बदली चा केला आणि अवैद्यरित्या तो अर्ज संगनमत करून सदर जमीन अदलाबदली केली. या प्रकरणी शेषेराव कसबे यांनी आवाहन दिल्या नंतरही अपर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे सदर अदला बदलीचा निर्णय कायम ठेवला होता. त्या निर्णयाला शेषेराव कसबे यांनी अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचेकडे अपील केल्या त्या प्रकरणी अपर आयुक्त यांनी ते दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. त्यामुळे या केजमधील भू-माफीयात खळबळ माजली आहे. तसेच केज गायरान जमीन आणि येवता येथील अदला बदली केलेली वर्ग २ ची जमीन ही वर्ग १ मध्ये परावर्तित होती परंतु या बाबत सर्व नियम धाब्यावर बसवून निर्णय दिला होता त्याला आता चाप बसला आहे.
आमदार नमिताताई मुंदडा यांनी केला अतारांकित प्रश्न उपस्थित :- याच गायरान प्रकरणी माजी नगरसेवक कपिल मस्के यांच्या तक्रारी वरून केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्या अनुषंगाने सदर आदेश रद्द करून नियमानुकूल केलेली जमीन शासन जमा करून संगनमताने पुर्वनियोजित कट कारस्थान करून शासनाची फसवणूक विश्वासघात केल्याने त्यांच्या विरोधात ठोस स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्या बाबतची मागणी केली. त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार केज यांच्याकडे माहिती मागितल्याने खळबळ माजली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पत्र :- अदला बदली प्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे बाबत शेषेराव कसबे यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे.

