shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अलिविहिर आश्रमशाळेत शंभर विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहिर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत येथील डॉ. शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन शंभर विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केले. यावेळी डॉ. शिंदे यांनी जीवन जगताना घेण्याची काळजी स्वतः कश्याप्रकारे घेता येईल, महान लोकांचे जीवन चारित्र्य कसे होते, आपण त्यापासून काय शिकू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. गणेश पाटील यांनी आदर्श मित्र कसा असावा व चांगल्या मित्राचे फायदे काय याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. शिंदे यांच्याकडून शंभर विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. 
मुख्याध्यापक यावेळी पी.एन. पाडवी यांनी शिक्षणाचे महत्व व त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. अधीक्षक एन. आर. कलाल यांनी सूत्रसंचलन केले. आभार टी. एच. चव्हाण यांनी मानले.
close