शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
साईबाबांचे समकालीन साईभक्त स्व.दगडूभाऊ गायके पाटील यांच्या 95 व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व साई भक्तांनी हजेरी लावत स्व.दगडु भाऊ गायके यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
साई मंदिर जवळ असलेल्या शताब्दी मंडपात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला साई समाधी मंदिरात स्व दगडु भाऊ गायके यांची प्रतिमा नेत साईबाबांची भेट घडविण्यात आली व साईबाबा संस्थानच्या वतीने व अडबंडणाथ संस्थानचे मठाधिपती अरुण गिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी गायके परिवारातील सर्व सदस्य तसेच शिर्डीतील ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महंत अरुण गिरी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा व महाप्रसाद साबुदाणा खिचडी चा उपस्थितांनी लाभ घेतला. या मा.जिल्हापरिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील,भाजपा चे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे ,मा.नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर,प्रतापराव जगताप,मा उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर,बाळासाहेब लूटे, मा.विश्वस्त सुमित शेळके,विश्वस्त सचिन कोते,शिवसेनेचे कमलाकर कोते,मा.उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर,भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे, शिवसेनेचे संजय शिंदे ,मधुकर कोते,अर्जुनराव जगताप,तुकाराम गोंदकर,तुषार गोंदकर मा.उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन,सर्जेराव कोते,संदीप पारख, साईबाबा संस्थान च्या वतीने प्रशासकीय अधिकारी,डॉ आकाश किसवे साहेब,बागवे साहेब,खराडे साहेब मंदिर अधीक्षक रमेश चौधरी ,मंदिर संरक्षक प्रमुख आण्णा परदेशी, साई मंदिर जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके ,तसेच समकालीन साईभक्त कै. तात्या पाटील कोते,म्हाळसापती,लक्ष्मीबाई शिंदे,अब्दुल बाबा,भागोजी शिंदे,संताजी शेळकेपाटील,यांचे वंशज या वेळी पुण्यतिथी निमित्त उपस्थित होते.

