शिर्डी । (संजय महाजन) :
आज दिनांक 5/2/2023 रोजी झालेल्या अहमदनगर योगासना असोसिएशनच्या वतीने अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथील विद्यार्थी कु. प्रतिक विजय ससाणे याने प्रथम क्रमांक व कु. रितेश नवनाथ बनकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. हे यश मिळवण्यासाठी शाळेतील कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे, विशेष शिक्षक श्री बालाजी हनुमंते, श्री शंकर सोनवणे व श्री गोवर्धन खांडेकर यांनी परिश्रम घेतले.
राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयातील मुख्याध्यापिका व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या.

