प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:- श्री विठ्ठल गड शिक्षण प्रसारक मंडळ सारणी सांगवी
संचलित प्रा विश्वनाथराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका प्राचार्य श्रीमती माधुरीताई जाधवर मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
शिवरायांचे आठवावे रुप।
शिवरायांचा आठवावा प्रताप।
शिवरायांचा आठवावा साक्षेप।भूमंडळी।।
निश्चयाचा महामेरु।
बहुत जनासी आधारु।
अखंड स्थितीचा निर्धारु।
श्रीमंत योगी।।
छत्रपती श्री शिवाजी महाराज अशा शब्दात महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी श्री व्ही आर घुले सर, श्री पंडित भोसले सर ,प्रा श्री अनंत आघाव सर, श्रीमती वायबसे मॅडम ,श्रीमती कांबळे मॅडम ,श्री पारखे सर ,श्री सरवदे सर, श्री हनुमंतराव मोराळे यांनी कार्यक्रम संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले .या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

