प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १९/ करमाळा शहरांमध्ये जय संघर्ष वाहन चालक - मालक सामाजिक संस्था यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ट्राफिक पोलीस जगताप साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीप ज्योत लावून फोटोस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. याप्रसंगी जय संघर्ष ग्रुप व करमाळा शहरातील सर्व वाहन मालक-चालक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

