shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिरात घेतले ४९३ रुग्णांनी उपचार तर २३ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिरात घेतले ४९३ रुग्णांनी उपचार तर २३ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आज दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वृद्ध रुग्ण व विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.
महाआरोग्य  शिबिरामध्ये सकाळी ९ ते ६ या वेळेमध्ये ४९३ रुग्णांनी या शिबिरात सहभाग नोंदवत उपचार घेतला. तर रक्तदान शिबिरामध्ये २३ रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले.
या शिबिरा च्या उद्घाटनाप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, बाळासाहेब शिवसेना पक्षाचे प्रमुख महारुद्र पाटील व राष्ट्रीय सेवा दलाचे राज्य संघटक गपूर सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नरेंद्र गांधी यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयासाठी ऑक्सिजन सुविधा देण्या संदर्भात भाष्य केले तर महारुद्र पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी बाळासाहेब शिवसेना पक्षाच्या वतीने जे काही सहकार्य करता येईल ते करण्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर राधिका हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी मूकबधिर विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रुग्ण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दीपक चोरमले व त्यांचा सर्व स्टाफ यांनी या शिबिराचे विशेष नियोजन करून यशस्वी केले.
close