कॅन्सर दिनानिमित्त प्रबोधन..!
जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस 'वर्ल्ड कॅन्सर डे' म्हणून पाळला जातो. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता अबाल वृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान दूर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सर कडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. समज- गैरसमजांचे जाळे आहे. त्यामुळेच आजच्या दिवशी कॅन्सर सारख्या आजाराबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, अहमदनगर च्या प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन संचलित निरीक्षण गृह व बालगृह, अहमदनगर येथे भेट देऊन तेथील मुलांना कॅन्सर संबंधी जागृत केले आणि भविष्यात सिगारेट, तंबाखू, पान मसाला व मद्यपान सेवन करण्यापासून दूर राहण्यास प्रबोधित केले. तसेच त्यांना खाऊचेही वाटप केले. हे प्रबोधन यशस्वी करण्यासाठी शेख मॅडम, मेहत्रे मॅडम, काळे मॅडम व मनसुके मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. कॅन्सर संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी तळागाळातल्या लोकांना कॅन्सर संबंधी माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे मत सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट च्या वतीने डॉ. हरीश लुंकड यांनी मांडले. सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिटय़ुट च्या विद्यार्थ्यांनी कॅन्सर संबंधित विविध प्रकारचे पोस्टर बनवून आपली मते दिलखुलासपणे मांडली. आभार प्रदर्शन श्री सागर लुंकड यांनी केले.

