जो आला तो असे आपला,
सोनियाचा दिसं,
उगा कुणाला कशास टाळा,
भेटावे दिलखूषं...१
तेढ मनाची नकाच पोसू
नकोच कासावीसं,
ऋणानुबंधा जपत रहावे
नकोच आडवी रीतं..२
संवादाने प्रेम वाढते
घडती गाठीभेटी,
कशास तेढा मनी जपावा
जीवन अल्पायुषी...३
काल भेटला आज संपला
वार्ता ऐशा येती,
वाटे तेव्हा क्षणभंगुर ही
सर्वच विश्वरहाटी...४
कशास आता वाट पहाता
सोडा मत्सर द्वेष,
भेटत जा हो आप्तस्वकीया
टाळूनिया अविवेक...५
ब्रह्मरसाचा फुटेल पान्हा
घडता ऐसी कृती,
मना मनाला मिळता शांती
सुखद घडे विश्रांती ...६
गाठी भेटी सात जन्म जरी
कशास पुढच्या जन्मी,
या जन्मातच ऋण फेडता
मोक्षच येईल हाती...७
मोक्ष-मुक्तीची कास धरावी
नको उधारी आता,
चंदू सांगे मार्गची सोपा
मना मनाला जपा...८
रचनाकार :
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने,
मोबाईल क्रमांक ९८८१३७३५८५

