shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

किल्ल्यातील देवस्थान खोलेश्वर महादेवाची नंदीवरून भव्य मिरवणुकीचे आयोजन ...


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि.१५/ करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील जागृत देवस्थान खोलेश्वर महादेवाची सालाबाद प्रमाणे यावर्षी ही श्री खोलेश्वर महादेवाच्या नंदीच्या खांद्यावरुन सवाद्य भव्य मिरवणूक फाल्गुन शु. तृतिया दि. २२\०२\२०२३ रोजी सायंकाळी 5.55 मि श्री खोलेश्वर मंदिरापासून निघणार आहे. 

सदर मिरवणूक महादेव मंदिर किल्ला वेस येथून निघणार असून मिरवणुकीचा मार्ग किल्ला वेस, फुलसौंदर चौक, जय महाराष्ट्र चौक, गुजर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्त पेठ, सुभाष चौक, राशीन पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ते महादेव मंदिर किल्ला वेस या मार्गे निघण्यात येणार आहे.

नंदीचे मानकरी खांदेकरी व आरती मंडळाचे सर्व सदस्य व करमाळा शहरातील सर्व भाविक भक्त यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. तरी भाविक भक्तानी या मिरवणूकीसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
close