प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : १५ / "मातृत्व ही एक शक्ती आहे.तीच चमत्कार घडवते.बाळाला नेमके काय
हवे,हे आईलाच कळते. आगरकरांचे मनी-मानसी हे पुस्तक म्हणजे आईच्या पराक्रमाचीच कहाणी आहे" असे विचार ज्येष्ठ पत्रकार, आकाशवाणीचे वृत्तनिवेदक अरविंद जोशी यांनी व्यक्त केले.
साने गुरुजी कथामाला जिल्हा समितीच्या वतीने विविध पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते डाॅ.गजानन कोटेवार हे अध्यक्षस्थानी होते.यावेळी कथामाला कार्यवाह अशोक खानापुरे,कोषाध्यक्ष अशोक म्हमाणे,सहकार्यवाह उज्ज्वला साळुंके,कथामाला
पदाधिकारी,सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरुणकुमार धुमाळ यांनी गायलेल्या साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.खानापुरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले.रामचंद्र धर्मसाले यांनी मान्यवरांचा
परिचय करुन दिला.
पुष्पा भातंब्रेकर स्मृति-आदर्श माता पुरस्कार
उर्मिला आगरकर यांना,डाॅ. वीणाताई सुराणा स्मृति-आदर्श समाजसेवा पुरस्कार वनिता तंबाके यांना तर साने गुरुजी गौरव पुरस्कार विजय बिज्जरगी यांना, प्रदान करण्यात आला.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच श्यामची आई संस्कार परीक्षेत योगदान देणा-यांचा तसेच आजीव सभासदांचा सन्मानही यावेळी करण्यात
आला.मध्यवर्ती कथामालेचे कार्यवाह सुनील पुजारी यांनी आभार मानले तर सोलापूर कथामालेच्या उपाध्यक्षा आरती काळे यांनी सूत्रसंचालन केले.

