shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या - ए पी आय योगेश उबाळे..!!


दृष्टी आहे तर सृष्टी आहे -प्रा.ईश्वर मुंडे!!                           

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

किल्ले धारूर तालुक्यातील गांजपूर येथे आनंद ऋषीजी नेत्रालय,अहमदनगर व ईश्वर शिक्षण संस्था,गांजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात उपचार शिबीराचे आयोजन केले होते.या शिबीराचे उद्घाटक म्हणून पोलीस स्टेशन  युसुफ वडगाव येथे नुकतेच रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे बोलत होते.




       पुढे योगेश उबाळे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहीजे.परंतू ग्रामीण भागात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.अशा शिबीरांच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला घरपोच आरोग्य सेवा मिळवून दिली. हा  ईश्वर शिक्षण संस्था,गांजपूर यांचा कौतूकास्पद उपक्रम आहे.

        या वेळी आयोजक तथा संस्थेचे सचिव प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले की,दृष्टी आहे तर सृष्टी आहे म्हणून प्रत्येकाची दृष्टी चांगली राहावी.गरजवंत गोर गरीब जनतेची सेवा घडावी म्हणून शिबीराचे आयोजन केले आहे.

    सदरील शिबीरामध्ये ९० रूग्नांची तपासणी केली असून आवश्यक उपचार करून सल्ले दिले आहेत सहा रूणांवर आनंद ऋषीजी नेत्रालय,अहमदनगर येथे मोफत मोती बिंदू शस्त्र क्रीया करण्यात येणार आहे.जाणे-येणे, निवास व भोजन व्यवस्था नेत्रालयाकडून मोफत केली जाणार असून भारतीय भिंग रू.२५००/ मध्ये बसवले जाणार आहे.

       शिबीरामध्ये गणेश तिडके (रा.रूई धारूर) दृष्टी तज्ञ,कंसल्टींग ॲाप्टोमोलॅाजीस्ट,आनंद ऋषीजी नेत्रालय,अहमदनगर व किरण सिरसट(रा.घन सावंगी) दृष्टी तज्ञ, कंसल्टींग ॲाप्टोमोलॅाजिस्ट, आनंद ऋषीजी नेत्रालय,अहमदनगर यांनी रूग्णांची तपासणी केली

close