प्रकाश मुंडे |बीड जिल्हा प्रतिनिधी :-
श्री.छञपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वसंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी सुरेश शिनगारे यांची,उपाध्यक्षपदी प्रा.सुरेश कांबळे तर सचिवपदी बाळासाहेब घुगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कोषाध्यक्षपदी श्री.डी.एस.यादव यांची निवड झाली. संचालक मंडळात संचालक म्हणुन प्राचार्य डॉ.माधवराव फावडे,माधव गायकवाड,मदन डोंगरे,सतिश नखाते,अनिल माचवे ,प्रा.शाहु साखरे,गणेश सपाटे,अनिल सावंत, अशोक म्हेञे, महिला प्रतिनिधी प्रा.अनुजा मोगले,सौ.रोहिणी पुरी यांची निवड झाली.जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी श्री.आर.एम.मोटे यांनी प्रशासकीय काम पाहिले.या सर्व पदाधिकारी व संचालकांचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे सचिव व भाजपा नेते रमेशराव आडसकर यांनी अभिनंदन केले आहे.सर्व पदाधिकारी व संचालकांचे सत्कार प्राचार्य डॉ.माधवराव फावडे व प्रा.शाहु साखरे यांच्या हस्ते करण्यात आले.

