shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थानची यात्रेची ध्वज, रथ व संकल्प पूजा संपन्न.

इंदापूर ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थानची यात्रेची  ध्वज, रथ व संकल्प पूजा  संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी इंदापूर ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थानची यात्रा संकल्प पूजा व आरती यांचे विधिवत पूजा ट्रस्टचे  प्रमुख राजाभाऊ वाशिंबेकर सौ. शैलजा वाशिंबेकर ,  मुकुंदशेठ शहा, सौ अंकिता ताई शहा  , अजिंक्य इजगुडे अश्विनी इजगुडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.तसेच श्री इंद्रेश्वर देवस्थानचे ध्वज व रथ पूजा वरील तीन उभयंत्याच्या व माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक बापू इजगुडे, संदीप वाशिंबेकर , रघुनाथ राऊत,  पोपट पवार,धीरज शहा,बाब्रस सर, अमित जौंजाळ, देवराज देशमुख, प्रकाश  शिंदे ,रघुनाथ खरवडे, भारत बोराटे, महादेव चव्हाण, श्रीकांत गुरव काका, गिरीश गुरव काका, अतुल शेटे पाटील, श्रीनिवास बानकर, आस्वाद जैजाळ , माधव गासकाटू ,भगत साहेब, रायसोनी व इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
इंदापूर शहराचे ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थान याचे महाशिवरात्रीनिमित्त ग्राम यात्रा व रथ उत्सव सोहळा मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३ ते रविवार ते दि. १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होत असून या ग्राम यात्रा व रथ उत्सव सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्ट इंदापूर व समस्त ग्रामस्थ इंदापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे. 
या यात्रा उत्सव सोहळ्यात दि. १४ फेब्रुवारी रोजी  श्री गणेश शिव पंचायतन पूजन व श्री इंद्रेश्वर महादेव रुद्र अभिषेक  श्री शिवलीलामृत पारायण  कुलस्वामिनी भजनी मंडळ इंदापूर यांचे भजन  बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी  श्री इंद्रेश्वर महादेव रुद्राभिषेक , श्री  शिवलीलामृत पारायण,  श्री गुरु माऊली भजनी मंडळ इंदापूर यांचे भजन सुवर्णकार महिला भजनी मंडळ इंदापूर यांचे भजन   संस्कार बालवर्ग लहान मुलांसाठी, कार्यक्रम नित्यपाठाचे श्लोक, श्री गणेश स्तोत्र, रामरक्षा, पसायदान, हनुमान चालीसा ,सूर्यनमस्कार, श्री गणपती अथर्वशीर्ष पठण ,श्री गणपती, श्री शंकराची, श्री दत्त महाराज, श्री देवीची आरती, गायत्री मंत्र  गुरुवार दि.१६ श्री इंद्रेश्वर महादेव रुद्राभिषेक श्री शिवलीलामृत पारायण व श्री शिव सहस्त्र नामावली व  श्री वीरशैव भजनी मंडळ इंदापूर यांचे भजन  शुक्रवारी रुद्राभिषेक श्री गणेश पूजा व ध्वज पूजन ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महादेव रथोत्सव संवाद्य मिरवणूक ध्वज नगर प्रदक्षिणा आरती व प्रसाद असा कार्यक्रम असून शनिवारी इंद्रेश्वर महादेव रुद्राभिषेक, महाशिवरात्री अष्ट प्रहर पूजा प्रारंभ, श्री रुद्राभिषेक, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र इंदापूर ,शारदा स्वरांजली संगीत अकॅडमी इंदापूर यांचा कार्यक्रम यानंतर दीप पूजन व महाआरती सायं.७:३०  ते रात्री ९ या वेळेत भवसंध्या भक्ती संगीत भावगीत लोकगीतांचा पुण्यातील नामवंत कलाकारांचा कार्यक्रम, १० ते १२ या वेळेत श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ खडकपुरा इंदापूर यांचे भजन. रात्री १२ वाजता श्री इंद्रेश्वर महादेव बिल्वपत्र अर्पण सोहळा संपन्न होणार असून रविवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी १० ते १२ काल्याचे किर्तन ह. प. श्री ओंकार महाराज जौंजाळ  इंदापूर यांचे होणार असून यानंतर १२:३० वाजता महाआरती महाप्रसादाचा सर्व भाविकांना लाभ देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ इंदापूर यांच्यावतीने  केले आहे.
close