इंदापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची १४२ वी पुण्यतिथी साजरी
इंदापूर: दि. १७ फेब्रुवारी रोजी इंदापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची १४२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी इंदापूर नगरपरिषदचे मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे व मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
या प्रसंगी दिलीप शिंदे,सचिन जामदार,राहुल जौंजाळ,आनसार शेख, संतोष धोत्रे,अरविंद ढावरे,धनंजय खंडाळे,ज्ञानेश्वर सोनवणे,नंदु खंडाळे,अक्षय काळे,सुरज कोळी,व सर्व समाज बांधव उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे नियोजन मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे यांनी केले होते.

