shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री गिरधरदास देवी विद्यालयात रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १७/ श्री गिरधरदास देवी विद्यालयात रथ सप्तमी व जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोजच्या धावपळीच्या जीवनात मानवाला शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे मानवाचे जीवन निराशाजनक व तणावपूर्ण झाले आहे. अशा तणावपुर्ण जीवनात उत्साह संचारावा, सुर्या पासून मिळणाऱ्या उर्जेचा उपयोग करून उत्साह निर्माण करणे, व्यायामाचे महत्व कळावे या हेतूने प्रशालेत सुर्यनमस्कार विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उगवणाऱ्या सुर्याची फैलावणाऱ्या किरणाची प्रतिकृती विद्याथ्यानी बनवून सुर्यनमस्काराचे सर्वप्रकार सादर करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाचे अध्यक्ष श्री. कन्हैयालाल देवी, सचिव श्री अमोद संचेती, सदस्या सौ सुनिताभाभी देवी, श्री विजयकुमार दोशी, श्री. चंद्रकात देवी यांनी विशेष कौतूक केले.

या उपक्रमाचे आयोजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एस.एम. जगताप यांचे मार्गदर्शना खाली आयोजित करून प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नेटके नियोजन केले.
close