shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बंसल क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षेचे भव्य दिव्य आयोजन!!

1.5 करोड रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि 31 लाख रुपयांचे रोख पारितोषिके..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतातील नामांकित क्लासेस पैकी एक असणाऱ्या  बंसल क्लासेसच्या वतीने इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. 



ही परीक्षा १८ व १९ फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना तब्बल दीड कोटीपर्यंतची शैक्षणिक शिष्यवृत्ती व एकतीस लाख रुपयांचे रोख पारितोषिके या परीक्षेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.

तरी विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी व टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आपल्या जवळील बंसल क्लासेस शाखा ठिकाणी दिनांक १७ फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.संबंधित परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत. अधिक माहिती बंसल क्लासेस केज शाखा आपणास देईल.
close