नगर प्रतिनिधी :
आज श्री साईबाबा महाविद्यालयात शिवजयंती महोत्सव उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.
याप्रसंगी शिवचरित्र कथाकथन, पोवाडा गायन असे विविध कार्यक्रम सादर केले.
शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन मा. प्राचार्य श्री विकास शिवगजे सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. शितल धरम ( इतिहास विभाग प्रमुख ) यांनी केले. विद्यार्थी मनोगते शितल भोकरे, आदित्य दुनबळे, कुणाल खरात, अर्पिता सुपेकर, रितेश भोसले यांनी केले. प्राध्यापक सादरीकरण प्रा. मोबीन शेख ( प्राणीशास्त्र विभाग) यांनी शिवरायांचा पोवाडा सादर केला व प्रा. राजेंद्र काळे (इतिहास विभाग) यांनी शिवबा पुन्हा तू अवतार घे ही कविता सादर केली. अध्यक्षीय मनोगत विकास शिवगजे तर आभार प्रा.मुबीन शेख यांनी केले. सूत्रसंचालन कु. हर्षदा बागल हिने केले. तर प्राध्यापक डॉ.मनीषा बोडके, प्रा. नानासाहेब सदाफळ, डॉ. गणेश भांड, डॉ.विक्रम सातपुते, पत्रकार तुषार महाजन व महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

