shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ तंत्रनिकेतनच्या सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम


प्रथमेश होले  88.79टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम तर ८८.१४% सह तन्मय गावखरे  द्वितीय

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २८ /   चास येथील सौ.सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक चास अहमदनगर महाविद्यालयातील एमएसबीटीई अंतर्गत हिवाळी  परीक्षा २०२२ महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती याचा निकाल जाहीर झाला असून आडसूळ तंत्रनिकेतनच्या सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा दरवर्षी प्रमाणे  यंदाही कायम राहिली आहे.

            अंतिम वर्षातील  कॉम्प्युटर इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने होले प्रथमेश सचिन 88.79%,द्वितीय क्रमांकाने भुसारी श्रुती 85.89%  आणि तृतीय क्रमांकाने कुलाल प्रांजल ८५.७८% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने सुयोग सयाजी नन्नवरे ८४.४० टक्के,द्वितीय क्रमांकाने उमेश बापू भुजबळ ७७.८० % आणि तृतीय क्रमांकाने गीताराम माने ७७.५० टक्के  गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सिव्हील इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने आशुतोष राजेंद्र घोडके 83.70 टक्के,द्वितीय क्रमांकाने अभिषेक मच्छिंद्र कदम ८२.४० टक्के  आणि तृतीय क्रमांकाने जाधव सुजल संजय ८२%गुण मिळवून उत्तीर्ण झाले. मेकॅनिकल इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने जाधव यश हर्षल ७२.३८% ,द्वितीय क्रमांकाने उगले ओम सुनील ६७.७१% आणि तृतीय क्रमांकाने राऊत प्रसाद शिवाजी ६४.७१% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

       द्वितीय वर्षातील कॉम्प्युटर इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने निकम आकांक्षा 84 % ,द्वितीय क्रमांकाने नलगे तेजस्वी 83.47% आणि तृतीय क्रमांकाने कोटस्ताने आर्यन ८२.५३% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने कराळे साक्षी 73.72 टक्के, गुण मिळवून उत्तीर्ण झाले. ई &टीसी  विभागातून प्रथम क्रमांकाने सोनवणे तन्मय जॉन 78.51 %  गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  

    सर्व विभागातून प्रथम वर्षातील कॉम्पुटर विभागातून प्रथम क्रमांकाने गावखरे तन्मय राजेंद्र ८८.१४% , रामनानी दिव्या ८५.५७% आणि तृतीय क्रमांकाने कोटस्थाने सुरवासे यश भगवान ७९.८६% गुण मिळवून उत्तीर्ण झाले .    इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने औटी ताराचंद   ८१.१४ %, द्वितीय क्रमांकाने देठे चेतन ७८.०४ %  आणि तृतीय क्रमांकाने काळे संचित   ७६.७१ % गुण मिळवून उत्तीर्ण झाले. ई &टीसी  विभागातून प्रथम क्रमांकाने दारकुंडे सुरज संजय ८२.१४% ,द्वितीय क्रमांकाने नगरवाला अब्बास शब्बीरहुसेन ८१.५७%  आणि तृतीय क्रमांकाने  सुरवसे यश भगवान 79.86% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सिव्हील इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने चोरमागे प्रतिक्षा शशिकांत 84.15%,द्वितीय क्रमांकाने गायकवाड केशव दत्तू ७७.२३%  आणि तृतीय क्रमांकाने बिडवे अभिषेक चंद्रकांत ७२.७१%गुण मिळवून उत्तीर्ण झाले. मेकॅनिकल इंजिनिअरींग मधून प्रथम क्रमांकाने लिपाने ओंकार बापूसाहेब 82%,द्वितीय क्रमांकाने रोहित निवृत्ती कळमकर ७२.५७%आणि तृतीय क्रमांकाने जाधव ओमकार ७९.७१  % गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

  विद्यार्थ्यांच्या  या यशामध्ये इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा.शीतल खेसे, संगणक विभाग प्रमुख प्रा.प्राजक्ता होले, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.प्रदीप लोंढे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा.सोनाली पाळंदे, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. आकांशा मस्के तसेच सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्राचार्य रमेश एस गडाख यांनी संवाद साधतांना   सांगितले. 

 संस्थेचे अध्यक्ष मा श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ,  संस्थचे उपाध्यक्ष मा श्री  विश्वनाथ माणिक आडसूळ, प्राचार्य  रमेश  एस गडाख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
close