shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर प्रीमियर लीग (WPL) ची रविवारी होणारधमाकेदार सुरुवात.

वालचंदनगर प्रीमियर लीग (WPL) ची  रविवारी होणार
धमाकेदार सुरुवात.

चार संघ मालकांनी केली लिलावाद्वारे खेळाडूंची निवड.

वालचंदनगरचे युवा नेतृत्व विक्रमसिंह मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वालचंदनगर प्रीमियर लीगचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगर येथील  युवा नेतृत्व विक्रमसिंह मोरे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त रविवारी होणाऱ्या  वालचंदनगर प्रीमियर लीगच्या चार संघ मालकांनी लिलावा द्वारे खेळाडूंची  दि.२७ फेब्रुवारी रोजी निवड केली.
 वालचंदनगर चे युवा नेतृत्व  उपाध्यक्ष  विक्रमसिंह मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वालचंदनगर येथे वालचंदनगर प्रीमियर लीग चे आयोजन रविवार  ५ मार्च रोजी करण्यात आले आहे व त्या स्पर्धेसाठी संघमालकांना लागणाऱ्या खेळाडूंची लिलाव प्रक्रिया द्वारे निवड सोमवार सायंकाळी करण्यात आली.सदरच्या लीग साठी वालचंदनगर ,कळंब, रणगाव व जंक्शन परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी सदर च्या लीग नियोजन केले आहे.सदरच्या लीग मध्ये खेळाडूंनी भरपूर प्रतिसाद देऊन लिलावा नुसार निवडीमध्ये  भाग घेतला. सदरच्या लीग मध्ये चार संघ आहेत व एका संघात १५ खेळाडू असतील.संघ मालक  सागर पाटील  , मिलिंद  साबळे , दादा चव्हाण ,  आनंद लोंढे  यांनी भाग घेऊन आपले खेळाडूंची निवड केली. सदरच्या लिलाव पद्धतीच्या निवडी वेळी  विक्रमसिंह मोरे, संजय माने,युवा उद्योजक  अमोल बोंद्रे, सागर पवार सर, राजेन्द्र हगवणे,  पिंटू परीट,  पिंटू आंधळे,  प्रशांत पवार , वालचंदनगर सहकारी बँकेचे चेअरमन  राजेन्द्र रणमोडे, सचिन गायकवाड उपस्थित होते. 
या वेळी बोलताना  विक्रमसिंह मोरे म्हणाले या स्पर्धेचे उद्दिष्ट हेच आहे की,वालचंदनगर व परिसरातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे व वालचंदनगरचा खेळाडू हा इतर लीग मध्ये जाऊन त्याचे नाव मोठे झाले पाहिजे. वालचंदनगर मधील टीम मध्ये बाहेर खेळायला जाण्यास काही अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा व सर्व खेळाडूंना स्पॉन्सरशिप देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सदरचा खेळाडू लिलाव निवडी वेळेस जेष्ठ खेळाडू  पिंटू आंधळे,  प्रशांत पवार, पिंटू होनमाने यांनी विक्रमसिंह मोरे यांचे कौतुक करून खूप  दिवसांनी जे  खेळाडूंच्या मनात होते ती लीग स्पॉन्सर केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले.

 विक्रमसिंह मोरे यांनी घोषित केले की, लवकरच इंदापूर प्रीमियर लीग चे आयोजन केले जाईल.
या वेळी  श्रीनिवास पाटील, अनिल कांबळे , अभिजित भांगे,  शुभम (गोटू) मोरे यांनी लिलाव निवडीचे चे काम पाहिले.   श्रीनिवास पाटील यांनी आभार मानले व लीग यशस्वी करण्यासाठी सर्व संघ मालकांनी व खेळाडूंनी सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली.
close