*एकलव्य संघटनेच्या वतिने दोन दिवसाचे जिल्हास्तरिय प्रशिक्षण संपन्न*
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
तालुक्यातिल जामगांव येथे 25 व26 फेब्रुवारी रोजी एकलव्य संघटनेकडुन अँक्शन एड संस्थेच्या सहकार्याने दोन दिवसांचे जिल्हास्तरिय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितित सदर शिबीर संपन्न झाले.
यावेळी 60 प्रशिक्षणार्थी पदाधिकारींनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षक म्हणुन कडुदासजी कांबले ,किरण ठाकरे सर, सुरेश ठाकर, अँड राजन वाघ, प्रा वैभव सोनवणे आदिंनी भुमिका पार पाडली तर मा शिवाजीराव ढवळे साहेबांनी देखील एक सत्र घेवुन पदाधिकारींना आदिवासींचे बजेट व पेसा अँक्ट याविषयी मार्गदर्शन केले प्रशिक्षणात गायरान शेती व राहत्या घरासाठी शासकिय प्रक्रिया, आदिवासी महिलांचे आरोग्य व अर्थिक सक्षमीकरण, आदिवासी कामगारांचे प्रश्न, जागतिकीकरण व धार्मिक कट्टरतावाद्यांचे आदिवासी संस्कृति व समाजजीवनावर होणारे दृष्परिणाम,संघटनबांधणी कौशल्य याविषयी दोन दिवस सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले शेवटच्या सत्रात पुढिल तिन वर्षाच्या कामकाजाचे प्रशिक्षणाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले.
प्रशिक्षणाला औरंगाबाद जिल्हा खादी ग्रामोद्योग चे अध्यक्ष संतोष माने यांनी भेट देवुन विभागाच्या योजनांमधुन आदिवासी बचतगट व महिला सक्षमीकरण कसे करता येईल याचे मार्गदर्शन केले तसेच यावेली संघटनेचे उपाध्यक्ष विलास मोरे, भारत मोरे, रामेश्वर माली, नंदु बर्डे, अनिल माली आदी पदाधिकारी उपस्थित होते औरंगाबाद एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर नाईक गंगापूर ,वैजापुर,पैठण, औरंगाबाद तालुक्यातिल पदाधिकारी यांनी प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले

