shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कीर्तनकार ह भ प सौ नागेश्वरी ताई झाडे (आळंदी देवाची) समाज प्रबोधनकार यांचे कीर्तनाचे आयोजन


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 शिर्डी गजर भक्तीचा साई हरिनामाचा शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला कीर्तन सोहळा शिर्डी येथे करावा अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे. असा दृष्टांत देखील काही भक्तांना झालाय. तो अनुभव भक्तांनी परम साईभक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विजय भाऊ कोते यांना सांगितला व हा बाबांचा आदेश समजून विजय भाऊ कोते यांनी परिसरातील भाविकांना एकत्र बसून यावर चर्चा केली. 

 भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला व दर महिन्याच्या मोठ्या एकादशीला साई हरी किर्तन सोहळा शिर्डी येथे करण्याचे ठरवले व आज कीर्तनाची सोळावी सेवा अविरतपणे चालू आहे दिनांक ३/३/२०२३ रोजी सायंकाळी ६ ते ३० ते नऊ वाजेपर्यंत कीर्तन सोहळा होणार आहे १६ कीर्तनाची सेवा साई हरिनाम कीर्तनाची सर्व व्यवस्था व खिचडी प्रसाद पंगत स्व सौ मनकर्णिका नारायण गोंदकर यांच्या स्मरणार्थ कीर्तनाची आयोजन करण्यात आले आहे कीर्तनाचे ठिकाण साई निर्माण कॅरियर अकॅडमी ग्राउंड एअरपोर्ट रोड शिर्डी श्रीकृष्ण नगर विजय भाऊ कोते यांच्या वस्तीवर होणार असून भाविकांनी या सोहळ्यातील किर्तन श्रावणाचा व साई खिचडी चा लाभ घ्यावा ही विनंती समस्त गोंदकर पाटील परिवार श्रीराम नगर शिर्डी व विजय भाऊ कोते साई निर्माण उद्योग समूह शिर्डी यांनी केले आहे.
close