shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

६० वर्षानंतर विस्मरण होण्यास सुरुवात होते म्हणून मेंदूचा व्यायाम महत्त्वाचा - लक्ष्मण गणपत गुणवरे.

६० वर्षानंतर विस्मरण होण्यास सुरुवात होते म्हणून मेंदूचा व्यायाम महत्त्वाचा  - लक्ष्मण गणपत गुणवरे.
इंदापूर: ज्येष्ठ नागरिक संघ  इंदापूर येथे आज दिनांक 25/2/2023 रोजी   लक्ष्मण गणपत गुणवरे यांचे हवा,पाणी, अन्न,व ध्वनी, प्रदुषणाप्रमाणे   कॅल्क्युलेटर अतिवापरामुळे बौद्धिक प्रदूषण , शाररीक व्यायामाप्रमाणे मेंदूस बुद्धिमत्ता सराव पुस्तके द्वारे व्यायाम करा असे अहवाल  लक्ष्मण गणपत गुणवरे यांनी केले.गणितामधील  दिव्य राशी, त्रिराशी, गणिती पद्धत त्यांची उदाहरणे त्यांनी दिली.६० वर्षानंतर विस्मरण होण्यास सुरुवात होते म्हणून मेंदूचा व्यायाम महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
सौ.जाधव मॅडम, यांनी गुणवरे यांचा पूर्व इतिहास सांगितला. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये  ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. प्रास्ताविक प्रमोद भंडारी यांनी केले.अध्यक्षीय भाषण बाबासाहेब घाडगे सर यांनी केले. 
संताई  एक तारी भजन, प्रकाश अडसूळ, अनिल कांबळे, सुखदेव बेरे, प्रमोद भंडारी, यांनी गायन केले,
,मा.मुख्याध्यापक उत्तम वणवे यांनी साथ दिली, या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री बाबासाहेब घाडगे सर, उपाध्यक्ष भानुदास पवार भाऊ, खजिनदार श्री काशिनाथ जगताप, पांडुरंग जगताप, खबाले महाराज, महादेव चव्हाण सर, भारत बोराटे सर, घाडगे गुरुजी, रघुनाथ खरवडे, सिकंदर इनामदार, पाणबुडे गुरुजी, बनसोडे सर,बागल सर , डॉक्टर शीरसकर , दगडू जाधव, या सर्वांचे उपस्थितीमध्ये आजचा व्याख्यानाचा, वाढदिवसाच्या ,एक तारी भजनाचा, कार्यक्रम संपन्न झाला. सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
close