एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती साजरी.
इंदापूर:निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे, पर्यवेक्षक मधुकर खरात, विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका आशा पर्वते यांनी संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मानवी जीवनामध्ये परोपकार महत्वाचे असतात. आपले आचार विचार शुद्ध असावे. संत नेहमीच मानवी जीवनाला सुख शांती समाधानाचा संदेश देत असतात. "मन चंगा तो कटूरी मे गंगा " म्हणून आपले मन निर्मळ असावी असा मौलौकिक संदेश संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराजांनी समाजाला दिला असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सांस्कृतीक विभागाने केले तर सूत्रसंचालन प्रमोद चव्हाण यांनी केले.

