shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत अपूर्व त्यागाला अभिवादन !!*

*भिमाई आश्रमशाळेत अपूर्व त्यागाला अभिवादन !!*

*इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या संस्थेत माता रमाईची १२५ वी जयंती साजरी.*
*इंदापूर*:- (दि.७) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक  व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सावली, सहचारिणी त्यागमूर्ती माता रमाईची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली . 

यावेळी इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरेंच्या (काकी) हस्ते सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, मातोश्री रमाबाई आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार तर संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या (तात्या)  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शकुंतला मखरेंनी उपस्थितांना जयंती दिनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी  मनिषा जगताप, नानासाहेब सानप यांची भाषणं झाली.
 यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव पवार यांनी केले.
close