प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १९ / नगर येथील सावेडी उपनगरातील निर्मलनगर भागातील युवकांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने बर्फामध्ये शिवलिंग साकारून अनोख्या पद्धतीने महाशिवरात्र साजरी केली . दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने निर्मलनगर येथील सेवार्थ प्रतिष्ठानच्या युवकांनी अध्यक्ष वैभव पोकळे यांच्या मार्गदर्शनाने आगळी वेगळी संकल्पना घेवून बर्फामध्ये शिवलिंग साकारल्याने अनेक शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला .
या प्रसंगी नगरसेवक सुनिल भाऊ त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबूदे उपस्थित होते . यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सेवार्थ प्रतिष्ठाण कडून सत्कार करण्यात आला .
प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव पोकळे यांनी सांगितले की , दरवर्षी प्रतिष्ठाण मार्फत सामाजिक उपक्रम राबविले जातात . आज महाशिव रात्रीच्या निमित्ताने बर्फात शिवलिंग साकारले . अनेक शिवभक्तांनी येवून दर्शन घेतले . अनेक महिला व पुरुषांनी या उत्सवासाठी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला .यावेळी सेवार्थ प्रतिष्ठाण मार्फत नागरिकांना केळी आणि खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या आयोजना साठी सेवार्थ प्रतिष्ठाणचे बाबू जाधव, दिपक साबळे, शेखर काते, प्रकाश बोराटे, सुमित हसेजा, अजिंक्य औटी, ऋषिकेश गोपाळघरे, पियुष सराफ, गुड्डू कांबळे, कृष्णा वाघमारे, अक्षय गंगार्डे, स्वप्नील तापकीर, प्रकाश मूळे,राहुल काते, भाग्यश्री पोकळे, कीर्ती सराफ, बरखा हसेजा, पूजा तापकीर, सुवर्णा भताने आदि युवक व महिला भगिनींनी परिश्रम घेतले .

