shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मंत्री पदी नागेश गलांडे यांची निवड झाल्याबद्दल केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते सत्कार..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील नागेश सुनिलराव गलांडे पाटील यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रांतच्या मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल,शनिवार दि 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11वाजता,केज येथील शासकीय विश्राम गृहात त्यांचा केज विधानसभा मतदार संघाच्या  लोकप्रिय आ. नमिताताई अक्षय मुंदडा व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार व भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी नागेश गलांडेपाटील यांचा शाल, श्रीफळ,व फेटा बांधून आ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना  नागेश गलांडे यांनी सांगितले की,आपण मराठवाड्याच्या आठ आणि खांदेशातील 3 अशा आकरा जिल्ह्यातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सुनीलआबा गलांडेपाटील ,तालुका अध्यक्ष भगवान केदार, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर,जि. प सदस्य विजयकांत मुंडे, विष्णू घुले, सुनील घोळवे, राहुल गदळे, महादेव सूर्यवंशी,ऍड शरद इंगळे,संतोष जाधव, ऍड दिनकर सपाटे, दगडू दळवे, अरुण काळे,चंद्रकांत भुजबळ,  डॉ अक्षय तांदळे,  जनकल्याण समितीचे ऍड अक्षय शिंदे,महेंद्र राऊत,   रवींद्र गलांडे, बंडू गदळे,दिलीप गायकवाड , चंदू मिसाळ ,अनंत आघाव, आबासाहेब केदार, छत्रुघन वनवे, यांच्यासह कार्यकर्ते  हजर होते.
close