प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
. करमाळा : २५ / करमाळा तालुक्यातील कंदर येथे ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. या अर्थिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मल्टिस्टेटच्या ग्राहक सेवा केंद्राचे शानदार उद्घाटन संपन्न झाले. प्रमुख पाहुणे मा.श्री.पोपाट दादा साळुंखे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.
प्रमुख उपस्थिती तसेच सन्मानीय उपस्थिती श्री. मौलासाहेब मुलाणी, श्री. दत्तात्रेय फुगे, श्री. आण्णासाहेब पवार, श्री. राजकुमार सरडे, श्री. दादासाहेब ननवरे, श्री. विजय नवले, श्री. अक्षय माने इ. उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार फुले वाहून दीप प्रज्वलन केले.
ज्योती क्रांती कर्मचारी श्री. संदीपान हजारे सर, CSP निरीक्षक, श्री. रफीक सलीम शेख सर (CSP निरीक्षक), श्री.अमोल राठोड (CSP निरीक्षक), श्री. गोरख भीमराव मोहिते (मॅनेजर ज्योती क्रांती मल्टीस्टेट टेंभुर्णी), श्री. महादेव खोचरे, श्री. पृथ्वीराज देशमुख, (ज्योती क्रांती मल्टीस्टेट करमाळा), श्री. गौरव तवरे शाखा विस्तार अधिकारी माढा तालुका, केंद्र चालक श्री. बालाजी आदलिंगे यांचे बहुसंख्य नातेवाईक व सर्व व्यापारी वर्ग आणि कंदर ग्रामथ मोठया संख्येने उपस्थित होते. ज्योती क्रांती मुख्य कार्यालयीन अधिकारी रफीक सलीम शेख सर यांनी याप्रसंगी ज्योती क्रांती सेवा- सुविधा आणि योजनांची माहिती दिली.

