shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिरुमला डोंगरावरील व्यंकटेश्वर बालाजी...!

तिरुमला व्यंकटेश्वर बालाजी

आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीपासून ९ किलाेमीटर अंतरावर तिरुमला डाेंगरावर तिरुपती व्यंकटेश्वर मंदीर आहे. काही भाविक येथे येण्यासाठी पायी मार्ग निवडतात. याचे दाेन साेपानमार्ग(पायऱ्यांचा रस्ता) आहे, जाे ६ ते ११ कि.मी. लांबीचा आहे. तिरुमला येथे आल्यावर सगळे ५० फूट ऊंचीवरील श्री व्यंकटेश्वर स्वामी महाद्वारापर्यंत पाेहचातात. येथून पुढे ते मुख्य मंदीराच्या खुल्या अंगणात प्रवेश करतात. गर्भगृहापर्यंत पाेहचण्यासाठी आठ दरवाजातून जावे लागते.

पहिल्या दरवाजातून जसे तुम्ही पुढे जाता तसे दरवाजे लहान व मार्ग अरुंद हाेत जाताे. हे आत्म्याची परमात्म्याशी भेट हाेण्याचे प्रतिक आहे. भाविकांना रांग लावण्यासाठी वैकुंठम क्यू काॅम्प्लेक्स आहे, ज्यात एकूण ५६ हाॅल आहेत. दर्शनासाठी प्रत्येक भाविकाला या सर्व हाॅलमधून जावे लागते. ४५० व्यक्ती रांगेत उभे राहण्याची या हाॅलची क्षमता आहे. 

अशा रीतीने अंदाजे २५ हजार भाविक रांगेत उभे राहू शकतात. दर्शन सकाळी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत २१ तास खुले असते. सहा तास रांगेत उभे राहिल्यानंतर दर्शन हाेते. दर तासाला अंदाजे चार हजार भाविक देवाच्या प्रतिमे समाेरून जातात.अशी जगविख्यात महिमा आहे, तिरुमला डोंगरावरील तिरुमला व्यंकटेश्वर बालाजींची....!
close