shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिटकेश्वरच्या योगेश किरकतने राष्ट्रीय स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक.

पिटकेश्वरच्या योगेश किरकतने राष्ट्रीय स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक.

अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत केलीइंदापूर महाविद्यालयाच्या  योगेश किरकत, युवराज निकम, संदीप मोरे यांनी चमकदार कामगिरी .

पिटकेश्वर गावासह इंदापूर तालुक्याचे नाव राष्ट्रस्तरावर खेळामध्ये नावलौकिक केल्याबद्दल किरकत कुटुंबासह गावातील मान्यवरांनी केले योगेश किरकतचे अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: आसाम मधील गुहाटी येथे १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील योगेश किरकत( पिटकेश्वर), युवराज निकम(रांजणी), संदीप मोरे (भिमानगर)या तीन युवा खेळाडूंनी  चमकदार कामगिरी करत यश खेचून आणले. या स्पर्धेत अंतिम सामना हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरुद्ध लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २-० गुणांनी सामना जिंकला. पुणे ग्रामीण मधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात इंदापूर महाविद्यालयातील या तिघांची निवड झाली होती. या तिघांनाही इंदापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक भरत भुजबळ तसेच अजित राऊत ,स्वप्निल गलांडे, विक्रम गलांडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
योगेश किरकत याने पिटकेश्वर गावासह इंदापूर तालुका व जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये नावलौकिक केल्याबद्दल पिटकेश्वर गावातील नीरा भीमा कारखान्याचे माजी संचालक नामदेव किरकत,सरपंच सुनिता भोसले,
 उपसरपंच शहाजी गायकवाड,तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी  येरळकर,  संचालक खरेदी विक्री संघाचे कैलास येरळकर,  ग्रामपंचायत सदस्य विजय मस्के,
 चेअरमन गोविंद कांबळे,प्रगतशील बागायतदार भास्कर पाडुळे,प्रगतशील बागायतदार सुरेश पाडुळे, प्रगतशील बागायतदार ज्ञानदेव शिंदे, अध्यक्ष लखन किरकत ,पप्पू कांबळे यामान्यवरांसह किरकत कुटुंबीयांनी त्याचे औक्षण करून कौतुक करीत अभिनंदन केले. 

योगेश किरकत हा इतिहास विषयांमध्ये कला शाखेमधून मास्टर झालेला आहे. त्याच्या या यशामध्ये घरातील सर्वात मार्गदर्शक गुरुवर्यांचाही सहभाग असल्याचा त्यांनी सांगितले.
close