शिर्डी । (संजय महाजन) :-
शिर्डी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीने संस्थान कर्मचार्याच्या विभागीय हिवाळी क्रीडा स्पर्धा साईबाबा चषक दिनांक १९/२/२०२३ ते दिनांक २१/२/२०२३ रोजी क्रिकेट स्पर्धा व दिनांक २६/०२/२०२३ रोजी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
तरी संस्थान चे सर्व विभागातील सर्व कायम/कंत्राटी/आउट सोर्स कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तरी ज्या विभागांना स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी दिनांक १०/२/२०२३ अखेर आपली संघाची नाव नोंदणी करून घ्यावी व स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे नाव नोंदणी संपर्क क्रिकेट स्पर्धा सतीश धनवटे 9623029191 हॉलीबॉल स्पर्धा सुनील पवार 9011126553 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी केले आहे.

