पतंजली योग परिवार इंदापूर व शहा सांस्कृतिक भवन इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वडापुरी येथील बोराटे मळ्यामध्ये हुरडा पार्टीचे व वनभोजनाचे आयोजन.
वनभोजनामध्ये फक्त पदार्थांचा आस्वाद न घेता अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून घेतला सर्वांनी आनंद.
इंदापूर: दि. १२ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी पतंजली योग परिवार इंदापूर व शहा सांस्कृतिक भवन इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हुरडा पार्टीचे आयोजन पतंजली परिवाराचे योगशिक्षक शहाजी बोराटे सर यांच्या वडापुरी येथील बोराटे मळ्यामध्ये करण्यात आले होते.
या हुरडा पार्टीमध्ये कलिंगड, द्राक्ष, पेरू, मक्याचे कणीस, मक्याची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, शेंगदाणा चटणी, काकडी, त्याचबरोबर स्पेशल औरंगाबाद वरून मागवलेल्या हुरड्याचा सर्व साधकांनी आस्वाद घेतला.
या वनभोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे दीडशे ते दोनशे साधकांची हजेरी आणि त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वनभोजनामध्ये फक्त पदार्थांचा आस्वाद न घेता अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले असून यात कुणी आपल्या आवाजाची जादू दाखविली, कोणी आपले कलागुण दाखवले, कुणी खळखळून हसविले तर कुणी पारंपारिक भारुड, अभंग सादर केले आणि एक लक्षणिय बाब म्हणजे श्री चव्हाण सर यांनी त्यांच्या अथक परिश्रमामधून २५ वर्षांमध्ये आत्मसात केलेली साधना हिप्नॉटिझमचे प्रत्यक्ष दर्शन सर्व योग साधकांना घडविले हे बघून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
ज्यांनी वर्षभर योग वर्गाला खळखळून हसण्याचे काम केले त्यांच्या कार्याचा सन्मानही करण्यात आला.
या वनभोजनाचे आयोजन नियोजन करणारे सर्व पतंजली परिवाराचे साधक पदाधिकारी त्याचबरोबर त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणारे सर्व साधक या सर्वांच्या प्रति पतंजली योग परिवाराचा अध्यक्ष या नात्याने दत्तात्रय अनपट आणि उपाध्यक्ष मदन चव्हाण सर्व साधकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली व असेच सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन मिळत राहो व हा परिवार वृध्दिंगत होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली.

