वीजतोडणी थांबविण्याची मागणी करीत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन.
इंदापूर: इंदापूर तालुक्यामध्ये सक्तीने वीजबिल वसुलीसाठी महवितरण कंपनीकडून शेतीपंपाची विजतोडणी सुरू आहे.यास विरोध दर्शवित तात्काळ वीजतोडणी थांबविण्याची मागणी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबतच्या निवेदनारूप इंदापूर तालुक्यामध्ये महावितरण कंपनीने चालू परस्थितीमध्ये सक्तीची वीजबिल वसुली करण्यासाठी वीज तोडणी मोहिम हाती घेतली आहे. ती तात्काळ थांबवावी व तोडलेली वीज कनेक्शने तात्काळ जोडावीत अन्यथा तमाम शेतक-यांसाठी जनआक्रोश आंदोलन ऊभा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच सध्या परस्थितीमध्ये शेतकरी अर्थिक अडचणीत आहे. कारण ऊस हे मुख्य पीक असताना त्याची बिले हि कर्मयोगी व निरा भिमा या साखर कारखान्यांनी वेळेवर दिली नाहीत. त्यामुळे शेतक-यांकडे पैसे उपलब्ध नाहीत. याचा गांभीयांने विचार करावा.आ.दत्तात्रय भरणे यांनी वीज तोडणी थांबविण्यासाठी आदेश दिले आहेत. परंतु आपणाकडून शेतक-याची मुस्कटदाबी चालुच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,
माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ, सुभाष डरंगे,राहूल गुंडेकर, वसीम बागवान यांचेसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
-
वीज तोडणी विरोधात मागील वर्षी जे भाजपाचे बडे नेते तालुक्यात रास्ता रोको करत होते, आता त्याचीच सत्ता आहे.त्यांनी पुर्ण डोळे उघडून पहावे.चिंतन करून मागील आंदोलन आठवावे. राज्यात सत्ता तुमची आहे वीज तोडणी थांबवा.नुसताच शेतक-यांचा कळवळा नको. वैयक्तीक स्वार्थासाठी तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लावला. अजुन किती नुकसान करणार आहात.
- अतुल झगडे (कार्याध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस)

