shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करून वीज पुरवठा तात्काळ सुरू करा इंदापूर तालुका रासपाच्या वतीने दिले इंदापूर तहसीलदार यांना निवेदन.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करून वीज पुरवठा तात्काळ सुरू करा इंदापूर तालुका रासपाच्या वतीने दिले इंदापूर तहसीलदार यांना  निवेदन.
इंदापूर : इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करून वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा अशा आशयाचे निवेदन पत्र देण्यात आले.

या निवेदन पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सध्या फारच अडचणीत आहे. परंतु महावितरणाने राज्यातील शेतकऱ्यांची शेतीचे वीज कनेक्शन कट केले आहे तरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मागणी आहे. शेतकऱ्यांची थकीत वीज बिल संपूर्णपणे माफ करावे.  शेतकऱ्यांस शेतीसाठी मोफत वीज देण्यात द्यावी आणि शेतकऱ्यांचा विज पुरवठा तात्काळ सुरू करा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय आणि महावितरणच्या कार्यालयावर तीव्र मोर्चा काढण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामा शासन जबाबदार असेल तरी सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार महादेव जानकर यांच्या नावाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष तानाजी मारकड यांच्या सहीचे निवेदन पत्र देण्यात आले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गोपने, उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, विधानसभा उपाध्यक्ष अविनाश मोहिते ,युवक अध्यक्ष आकाश पवार, नवनाथ कोळेकर ,गणेश हेगळकर ,अभिजीत मारकड, अमोल लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
close