इंदापूर तालुक्यातील तरुणाईचं आशास्थान..... राजवर्धन दादा पाटील.
राजवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.
निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंदापूर तालुका भाजपा कोअर कमिटीचे सदस्य माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे सुपुत्र इंदापूर तालुक्यातील तरुणाईचे आशास्थान राजवर्धन दादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन..
उत्कृष्ट संघटन कौशल्य, तळागाळातील लोकांच्या समस्येयेची जाणीव, जनतेमध्ये सहज मिसळ्ण्याची सहजता, कर्यकर्त्यांमध्ये आस्था अन् आपुलकीने थेट संवाद साधण्याची सहजता,तरुणाईच्या भविष्याचे अचूकतेने वेध घेण्याची कमालीची क्षमता, तरुणाईचे प्रेरणादायी आशास्थान,भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी मंत्री मा.हर्षवर्धनजी पाटील यांचे सुपुत्र युवा नेते राजवर्धन पाटील हे उच्चशिक्षित असून त्यांनी लंडनमध्ये पदवी घेतलेली आहे. सध्या त्यांच्याकडे इंदापूर भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख पद असून ते निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ याचे ते संचालक आहेत. अतिशय कमी कालावधीत त्यांनी आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्य,वक्तृत्व शैलीच्या जोरावर लोकांमध्ये लोकप्रियत्ता निर्माण केली आहे.
इंदापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांची असलेली जान व जनतेमध्ये थेट मिसळण्याचा त्यांचा मनमिळावू स्वभाव हे त्यांच्या लोकप्रियतेचे कारण बनले आहे.युवा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचे कौशल्ये यामुळे अल्प्वाधित ते तरुणाईला आशास्थान वाटू लागलेत. युवा वर्गाबरोबरच ते सर्वसामान्य लोकांमध्येही लोकप्रिय झाले आहेत. सतत तालुक्यातील अनेक कुटुंबांच्या सुख दुःखांच्या प्रसंगी सामील होऊन सर्वांना आधार देण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे ते इंदापूर तालुक्यातील वाड्या वस्त्यांपासून ते गावागावात आपल्या या समाजाभिमुक कार्याच्या रूपाने पोहचले आहेत.
अगदी लहानांपासून ते अबाल वृद्धांबरोबर त्यांच्याशी आस्था आपुलकीने बोलणे. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांना आपुलकीने जवळ घेत त्यांच्याशी विचारपूस करणे.वृद्ध व्यक्तींच्या बरोबर आपुलकीने व आस्थेने गप्पा मारणे. त्यांची विचारपूस करणे. जुन्या आठवनींना उजाळा देत त्यांच्याकडून काही माहिती व मार्गदर्शन मिळते का याची जिज्ञासा बाळगत त्यांच्याशी बोलणे. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे कोणत्याही कामाचे तात्काळ निरासन करण्याचा प्रयत्न करणे. ही त्यांची खरी कार्यशैली विशेष स्वरूपात जनसामान्यांमध्ये दिसून येत आहे. हे त्यांच्या अल्पावधित लोकप्रिय होण्यामुळे ते सर्वांनाच हवेहवेसे वाटू लागलेत. तरुणाईला तर ते आशास्थान वाटू लागले आहे.
आज राजवर्धन दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्यासाठी व भावी राजकीय वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख.आजच्या तरुणाईला निश्चितपणे दिशादर्शक ठरेल.
लेखन: डॉ. प्रकाश पांढरमिसे
शब्दांकन: तात्याराम पवार

