वडाळा महादेव । प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील कवी गीतकार बाबासाहेब पवार यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने युट्युब चॅनेल वर शिवरायांच्या स्वराज्यासाठी हे नवीन गाणे प्रकाशित झाले आहे या गीताचे गीतकार व संगीतकार बाबासाहेब पवार असून औरंगाबाद येथील गायक आकाश मिसाळ हे आहेत तर संगीत संयोजन पवन थोरात यांचे आहे.
कवी बाबासाहेब पवार यांची अनेक गाणी आकाशवाणी व यूट्यूब चैनल वर प्रकाशित व प्रसारित झाले आहेत त्यांची ती व सांज हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत दरवर्षी काव्य सरिता दिवाळी अंकाचे ते संपादन करत असतात महाराष्ट्रातून अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत त्यांच्या या गाण्याबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

