shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भक्तीचा भावच माणसाकडुन पुण्यकर्म घडवून घेते : नेहाताई भोसले


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी

शिर्डी साईंची पवित्र भुमी आहे पुण्यकर्म पाठीशी असेल तर माणसाच्या हातुन चांगले कर्म घडत असते भक्तीचे भाव असेल तरच पुण्य कर्म घडत असते त्यासाठी पुण्याचा संचय असेल तर जीवनाचा मार्ग सहजपणे सोपे होते. त्यासाठी चांगले कर्म करा प्रेमातच मोठे समाधान आहे भाव असल्याशिवाय भक्ती घडत नाही त्यासाठी चांगले कर्म करा ह भ प आंळदीकर यांनी साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी विठ्ठल सोमवंशी यांच्या आयोजित सेवानिवृत्त कार्यक्रमात किर्तनात शिर्डी येथे बोलताना सांगितले.


 याप्रसंगी काशिकानंद महाराज माजी नगराध्यक्ष कैलास कोते माजी उपनगराध्यक्ष विजय कोते ताराचंद कोते आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते ह भ प नेहाताई भोसले आंळदीकर पुढे म्हणाल्या की संताचे विचार ऐकण्यात मोठे समाधान आहे त्या शिवाय जिवाचा उद्धार होणार नाही संत व भगवंताचे आचरण करण्याची गरज आहे दोन वर्षांपूर्वीच्या कोव्हीड काळात जे गेले त्यांचे दुःख आहे पण जे नशिबाने वाचले त्यांनी आता जीवन जगत असताना भगवंताची आराधना करण्याची गरज अआहे चांगले कर्मच तुमच्या जीवनाचा उद्धार करतील त्यामुळे हा सुंदर देह भंगवतानी दिला असून त्याचा सदुपयोग करा परमार्थासाठी मृहर्ताची गरज नसते त्यामुळे त्यासाठी संकल्प गरजेचे असल्याचे स्पष्ट केले तुम्हाला भगवंताचे आचरण करण्यासाठी वेळ काढण्याची गरज नाही साईंच्या दरबारात किती दान केले यापेक्षा कोणत्या भावनेने दिले आहे हे साईबाबांना अभिप्रेत आहे त्यामुळे जशी भक्तांची गर्दी वाढत आहे तशीच दानपेटीतील दानराशी वाढत आहे यामागे साईंच्या प्रति असलेली साई भक्तांची श्रद्धा मोठी आहे हेच आज दिसुन येत आहे असे सांगत यावेळी महिलांशी बोलताना सांगितले की मुलींना गर्भातच मारू नका त्यामुळे मुला मुलींच्या जन्मदरामध्ये मोठा असंतोल होत असून त्यामुळे अनेक मोठ्या समस्या निर्माण झाले आहे.


 त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे जर कोणी असे कृत्य करत असेल तर ते मोठे पाप असल्याचे सांगितले शिवाजी सोमवंशी व सौ सुनंदा सोमवंशी यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, विजय जगताप, श्री साई संस्थान सोसायटी संचालक विठ्ठल पवार, भाऊ भोसले, नवनाथ थोरे, अशोक सुपेकर, उत्तम भैय्या कोते, धनंजय साळी, ताराचंद कोते, रविंद्र कोते आदी उपस्थित होते यावेळी महाप्रसाद देण्यात आला यावेळी आभार गणेश सोमवंशी यांनी मानले.
close