shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै.सदाशिव देवकर यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम रामायणाचार्य मारूती महाराज झिरपे यांचे प्रवचनाने संपन्न..!


वडाळा महादेव:- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव (जेठे वस्ती ) येथे कै.सदाशिव चिमाजी देवकर यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रामायणचार्य हभप मारूती महाराज झिरपे यांच्या प्रवनाने कार्यक्रम संपन्न ‌झाला. 


       यावेळी झिरपे महाराज यांनी आपल्या सुश्राव्य व सुमधुर वाणीतून कै.सदाशिव देवकर यांनी जीवनात केलेल्या कार्याचे गौरव वर्णन करत त्यांनी केलेल्या पत्नी, मुलांची,आई-वडीलांची व नातेवाईक यांची सेवा निस्वार्थ भावनेने केली. अशी सेवा करणारे सेवाभक्त फार कमी असतात..अशावेळी ते त्यातील एक होते..

आई-वडीलांची सेवा निस्वार्थ भावनेने करा.. तुमच्या जगण्याचे सार्थक होईल.. हभप झिरपे महाराज

ज्या परमात्म्याने तुम्हाला जन्माला घातले. ते कशासाठी तर आई-वडीलांची सेवा ही जगातील सर्वश्रेष्ठ सेवा आहे. ही सेवा जो मनोभावे प्राप्त करतो.. त्यांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो.. त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी ते नाहिसे होतात. यासाठी आई-वडीलांना वृद्धाश्रमात कधीही पाठवू नका.त्यांच्या दु:खाचे कारण बनु नका..! 

तसेच हभप मारूती महाराज झिरपे यांनी गोमाता सेवा, राष्ट्र सेवा, समाज सेवा, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, आरोग्य यावर अनेक साधुसंतानी केलेल्या कार्याचे दाखले दिले.. त्याचप्रमाणे प्रत्येकाने असे कार्य करत रहावे .. असे आवाहन देखिल केले. 

हा पुण्यस्मरण कार्यक्रम प्रकाश देवकर, तुळशीराम देवकर, ज्ञानेश्वर  देवकर,भगवान देवकर, अशोक कुसळकर यांनी यशस्वी रितीने पार पाडला.

यावेळी हभप सखाराम महाराज जेठे, दत्तात्रय धोत्रे (मुंबई),सरपंच कृष्णाजी पवार पा., रघूनाथ उघडे,सुरेश धनवटे(गदेवाडी) मा.सरपंच सचिन पवार, वडाळा महादेव,शेवगाव येथील भजनी मंडळ,वडाळा महादेव ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
close