shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवकांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करत वाढदिवस केला साजरा...!

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
 लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी काळभोर यांच्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहेत या अनुषंगानेच दिनांक २ फेब्रवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका संघटक पत्रकार कु.दिगंबर भाऊ जोगदंड, श्रीमंत अंबरनाथ तरूण मंडळ मा.अध्यक्ष श्री.जयनाथ दादा काळभोर, रॉयल कार उद्योग समूहाचे चेअरमन श्री.शब्बीर शेठ सय्यद,सह्याद्री स्पोर्ट्स क्लब जिम समूहाचे प्रमुख श्री.गणेश दादा नगिने या युवकांने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला. 

या मध्ये फणस, उंबर, कंरज, कडुनिंब, चिंच, आंबा, करंज, खैर, शिशु, कांचन,रेट्री,अश्या जंगली वृक्षांची लागवड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष श्री. सिताराम भाऊ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आली या वेळी पंढरीनाथ नामुगडे,राम भंडारी,तुषार काळभोर, दिपक गिरी सर,विकास काळभोर, अमन शेख, सर्व पत्रकार तसेच ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप,  दत्तात्रय शेंडगे, दिगंबर जगताप, अभिषेक पवार, उपस्थित होते.वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी." संतानी किती आत्मीयतेने निसर्गाबद्दल,वृक्षांबद्दल लिहिले आहे.

बहरलेला निसर्ग कोणाला आवडत नाही? पानांची सळसळ, पक्षांचे मधुर गीत, झऱ्यांची खळखळ, धबधब्याचा घन गंभीर नाद, समुद्राच्या लाटांची गाज, निसर्गाचे हे रम्य रूप आपले सगळे दुःख विसरायला लावते. म्हणूनच आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत. नव्हे नव्हे तर ती जगवली पाहिजेत असे प्रतिपादन श्री. सितारामजी लांडगे यांनी केले.तेसेच ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ शेंडगे यांनी आभार मानले व सूत्रसंचालन प्रविण जाधव यांनी केले.
close