इंदापूर प्रतिनिधी: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 3/2/2023 रोजी निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील निमगाव केतकी, पंधारवडी, झगडेवाडी या कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली ..
त्यावेळी निरा भिमा कारखान्याचे सभासद प्रल्हाद राऊत, गोकुळ व्यवहारे ,संभादेव बागल, विलास भोसले, श्री बाबासाहेब निवृत्ती घाडगे सर,अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर, टोळी मालक तानाजी कोकणे, शिवाजी कोकणे ,देवई कोकणे, यांच्या तीन टोळ्याची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार केले. निरा भीमा कारखान्याचे संचालक श्री सवासे दत्तू यशवंत, यांच्या टोळीची तपासणी केली. श्री साधू चांगदेव ननवरे, आज एकूण पाच टोळ्यांची तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले.113 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी करता वेळी निरा भिमा कारखान्याचे कर्मचारी श्री पाटील भागवत , ॲग्री ओव्हरसियर क्लार्क श्री वाघमोडे संदीप कांतीलाल, श्री घोगरे किरण , यांच्या मार्गदर्शनाखाली आजची आरोग्य तपासणी करण्यात आली .
त्यावेळी केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार मॅडम नर्स गौरी राठोड ,सानिका फुलारी वॉर्ड बॉय रणजीत साठे, केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याची आरोग्य तपासणी पार पडली.

