शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
यंदाच्या ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असले तरी देशप्रेम आणी राष्ट्रभक्ती आजही ग्रामीण भागात ख-या अर्थाने दिसून येते.राहाता तालुक्यातील उत्तर बाजूस असलेल्या कनकुरी गांवात एका शेतकऱ्याच्या दोघी लेकींनी अत्यंत महत्वाच्या सामाजिक प्रश्नांवर केलेल्या फर्राटेदार भाषणाने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकत भुरळ घातली आहे.
कु.ओवी पवार
तालुक्यातील शहरी भागातील मुलां मुलीनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नावलौकिक प्राप्त करून दिला आहे.त्यापाठोपाठ आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुली देखील मागे राहिल्या नाही.याची प्रचिती २६ जानेवारी रोजी कनकुरी येथे पहावयास मिळाली सकाळी आठ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यानंतर भाषणांसाठी मुलां मुलींना व्यासपीठावर संधी देण्यात आली होती.याचा फायदा घेत कनकुरी गावातील शेतकरी व श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे संचालक विठ्ठल पवार यांच्या कु.भुमी इयत्ता दुसरी आणी कु.ओवी इयत्ता पहिली या दोघी सख्ख्या बहिणींनी अतिशय दमदार भाषण करत मिळालेल्या संधीचे सोने केले.कनकुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या भुमी हिने स्रि भ्रुण हत्या याविषयांवर तर ओवी हिने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्व पटवून दिले.तसं बघीतले तर आज व्यासपीठावर बोलायला भल्याभल्यांना अशक्य असते ते या दोन्ही लहान बहिणींनी शक्य करून दाखवले आहे.एवढ्या कमी वयात अचूक आणी सुरेल आवाजात या दोघींच्या भाषणाने लहानग्यांपासून ते अगदी वयोवृध्दांपर्यत सर्वांचीच मने जिंकली. दिवसरात्र काळ्या मातीत काबाडकष्ट करणाऱ्या शेतक-याच्या मुली देखील आता मागे राहिल्या नाही.या दोन्हीही सावित्रीच्या लेकींचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली.१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले.परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.काही सण असे आहे जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहे.ते ग्रामीण भागात आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात.२६ जानेवारी हा देखील असाच एक सण आहे.जो देशाचा राष्ट्रीय सण आहे.देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा,जातीचा किंवा पंथाचा असो हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करत असलो तरी देखील या दोन्ही राष्ट्रीय सणांना ग्रामीण भागात आजही अनन्य साधारण महत्त्व दिले जाते.पवार कुटुंबातील कु.भुमी आणी कु.ओवी यांनी स्रि भ्रुण हत्या तसेच संविधानाची व्याख्या यांसारख्या गंभीर विषयावर प्रजासत्ताक दिनी आपले मनोगत व्यक्त करत सामाजिक प्रश्नांना 📖 फोडण्याचे काम केले असून या दोन्ही बहिणीचे भवितव्य उज्ज्वल असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षकवृंद श्री साळीसर श्री वायाळ सौ पठाडे उपस्थित होते.

