काचोळे विद्यालयाची गुणवत्तेकडे वाटचाल कौतुकास्पद - मीनाताई जगधने
विद्यालयात सन्मान गुणवंतांचा
शौकतभाई शेख
श्रीरामपूर - दहावीनंतर विद्यार्थ्यांनी आपला कल, बौद्धिक क्षमता, छंद व आवड लक्षात घेऊन करिअर करावे. हे करत असताना सातत्याने अभ्यास, जिद्द, चिकाटी, कठीण परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. कुठल्याही अपयशाला न डगमगता आत्मविश्वासाने सामोरे जावे. केवळ चांगले गुण मिळणे म्हणजे शिक्षण नव्हे तर शिक्षणातून माणूस जगण्याची कला शिकला पाहिजे. शिक्षणाला व्यवहाराची जोड देणे ही आज काळाची गरज आहे म्हणून मुलांनी शिक्षणाबरोबर आपणामध्ये असणारे कौशल्ये विकसित करावे व भविष्यात आवडीचे क्षेत्र निवडावे त्याचबरोबर विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यालय नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत विद्यालयाची प्रगती ही कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व श्रीरामपूर रयत संकुलाच्या चेअरमन श्रीमती मीनाताई जगधने यांनी व्यक्त केले. डी डी काचोळे माध्यमिक विद्यालयात गत शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी एन एम एम एस, स्कॉलरशिप इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार मीनाताई जगधने यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला त्यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील साळवे यांनी विद्यालयातील विविध प्रकल्प व उपक्रमांची माहिती सांगत भौतिक व गुणात्मक विकासाच्या वाटचालीची माहिती विशद केली व मान्यवरांचे स्वागत केले .
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, संपादक करण नवले, संपादक प्रकाश कुलथे, सहसंपादक राजेंद्र बोरसे, सहसंपादक महेश माळवे, लोकशाही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी गोविंद साळुंके, सहसंपादक चंद्रकांत वाघचौरे, पत्रकार अनिल पांडे, पत्रकार पद्माकर शिंपी, पत्रकार संतोष बनकर, प्रा. अण्णासाहेब गोराणे, मेजर कृष्णा सरदार, मुख्याध्यापिका सोनाली पैठणे, माजी पर्यवेक्षक विठ्ठलराव बोरुडे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर, आदींसह मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब भांड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी गोराणे सिद्धेश अण्णासाहेब,जोशी अवधूत अधिक,कु.दुधाळे प्राजक्ता दीपक,देसाई कार्तिक सतीश, कु.क्षीरसागर नेहल उदय ,दिघे अथर्व दत्तात्रय,शिंदे साईराज भागवत,कु. कल्हापुरे श्रावणी देविदास,कु. निकम सायली शरद, कु यादव श्रुतिका सुनील,कु. यादव श्रेया सुनील, पिलगर आयुष रामनाथ,गांगर्डे समर्थ बाबासाहेब,सरदार स्वराज नारायण,कु.साळुंके वैभवी सोमनाथ,दिघे अथर्व दत्तात्रय,कु. दुधाळे प्राजक्ता दिपक,देसाई कार्तिक सतीश,कु. बनकर निसर्गा सचिन,कु. गायकवाड दिशा बाळासाहेब,सरदार स्वराज नारायण,शेख मिजान असलम, कु. शिंदे काव्यांजली तात्यासाहेब, कु. दळवी सिद्धी विजय,वेताळ विवेक अविनाश,सोळस वैभव साईनाथ,भिवसने ओम महेंद्र, खरात ऋतुराज प्रविण,धनवटे प्रणव अनिल, सोलट विश्वजीत दत्तात्रय,पडोळे हर्षद जगन्नाथ, पवार क्षितिज अनिल,कु.तनपुरे वैष्णवी संभाजी, कु.चव्हाण रितिका विक्रम, निंबाळकर कार्तिक उमेश आदी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पालकांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक संतोष सोनवणे, सोपान नन्नावरे, दत्तात्रय खैरे, रवींद्र निकम,भाऊसाहेब लोंढे, नानासाहेब मुठे, मनीषा घावटे,रंजना कदम, अनिता कालंगडे, विपुल गागरे, प्रियंका पाथरकर, नीलिमा गेडाम, गोरक्षनाथ आंबेकर, दीनानाथ धनवडे, तनुजा बोरावके, रीना जोशी, आदी शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पालकांनी विद्यालयाच्या स्पर्धा परीक्षेतील यशाबाबत कौतुकास्पद गौरवोद्गार काढले.
विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब मुठे यांनी सूत्रसंचालन केले तर संगीता उगले यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

