shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पळसनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून केली समाज जागृती.

पळसनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून केली समाज जागृती.
फोटो : देशभक्तीपर गीत सादर करताना विध्यार्थी
   इंदापूर:   पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनातर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध कला गुणांना वाव मिळण्यासाठी आशा प्रकारच्या कार्यक्रमची आवशकता आहे असे मत   संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी व्यक्त केले.
          विद्यालयातील सातशेहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्य  सादरीकरणा  बरोबर पर्यावरण रक्षण संदेश, मोबाईलचे दुष्परिणाम, स्त्री शिक्षणाचे महत्व, पाणी बचत यासारखे सामाजिक समस्यांवर विध्यार्थ्यानी नाटक व गीत सादर केले .  सोबतच इतिहास सांगणाऱ्या गाण्यांसह  समाजप्रबोधन, शेतकरी नृत्य, पारंपारिक लावणी लोककला, देशभक्तीपर गीत कार्यक्रमाबरोबर हिंदी-मराठी गाण्यांवर नृत्यकला सादर केली .
          सुमारे पाच तास चाललेल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रतिसाद म्हणून ग्रामस्थांकडुन जवळपास ५० हजार रुपये बक्षीस जमा झाल्याची माहिती प्राचार्य बिभीषण शेरखाने यांनी दिली. या वेळी भाजप युवा मोर्चा कोअर् कमिटीचे इंदापूर तालुका प्रमुख  राजवर्धन पाटील, इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार , उपनिरिक्षक महेश माने , संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे , सरपंच इंद्रायणी मोरे  , योगीराज काळे ,  बबन काळे  , पळसदेव व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. तर तानाजी इरकल यांनी आभार मानले.



close