चिखली गावचे ग्रामदैवत श्री सिध्दनाथ जोगेश्वरी देवीची यात्रा उद्यापासून तीन दिवस.
पंचक्रोशीतील लोक एकत्र येऊन करणार आनंदात यात्रा उत्सव संपन्न.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील चिखली गावचे ग्रामदैवत श्री सिध्दनाथ जोगेश्वरी देवीची यात्रा प्रत्येक वर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेला असते. ती यात्रा उद्या दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी असून चिखली गावासह पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन यात्रेत सहभागी होत आनंदी वातावरणात यात्रा संपन्न होणार असून या यात्रा कालखंडात सकाळी महापूजा अभिषेक आरती करून सर्व पुजा विधी संपन्न झाल्यानंतर सायंकाळी गावातील जेष्ठ व्यक्तीच्या हातुन श्रीफळ अर्पण करून दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री सिद्धनाथ जोगेश्वरी पालखी व सासणकाठीची विधीवत पुजा करून सासणकाठी व पालखीचा मंदिरातुन पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातुन छबिना निघणार आहे. यावेळी गावातील महिला आपल्या दारासमोर सडासामर्जन करुन रांगोळी काढलेल्या पालखी मार्गावर साधारणपणे छबीना आठ वाजण्याच्या सुमारास मंदिरात पोहचेल. त्यानंतर आरती व गावातील सर्व ग्रामस्थ महिला लहान थोर यांना समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीने सालाबाद प्रमाणे महाप्रसादाचा लाभ देण्यात येणार आहे.
दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मूर्तीचे दुग्ध जलाभिषेक व पूजा आरती यानंतर दिवसभर भाविक भक्त दर्शन सोहळा चालू राहणार असून सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली चा वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम सोळा संपन्न होणार आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी दुग्ध जलाभिषेक पूजा आरती झाल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ याचा मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आनंदी वातावरणात यात्रा पार पडणार असल्याची माहिती श्री सिद्धनाथ यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ चिखली यांच्या वतीने देण्यात आली.

