लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयात 'हर्ष-स्पंदन' सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:शालेय जीवनातील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ. मग या स्नेहसंमेलनात विद्यार्थी गाणी, नाटक, नृत्य सादर करतात.गेली दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनात सहभागी होता आलं नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन साजरे करण्याची सूचना संस्थेचे अध्यक्ष .हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
यानुसार विद्यालयाचे प्राचार्य .भीमराव आवारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षकांनी गणेश वंदना, वारकरी नृत्य, लावणी,थीम साँग, किर्तन, देशभक्ती गीत,अराधी गीत, भक्ती गीत, सैनिक गीत इ. विविध प्रकारचे नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बक्षिसे ,टाळ्या देत प्रोत्साहन दिले व कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सहकर मंत्री *.हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास माजी सभापती विलास बापू वाघमोडे , पोलीस निरीक्षक दिलीपराव पवार , बावडा पोलीस दुरुक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, संस्थेचे सचिव किरण पाटील, संचालक प्रसाद पाटील .स्वप्नील घोगरे,. संजय घोगरे,.संतोष सूर्यवंशी व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तत्पूर्वी विद्यालयातील कलाशिक्षक .नवनाथ कुंभार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे - कलादालनाचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ साठीचा विद्यालयातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार (स्टुडन्ट ऑफ द इयर ) कु.धनश्री पोपट चव्हाण*या विद्यार्थ्यांनीस माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हस्ते प्रदान करण्यात आला.
बोराटवाडी गावचे शहिद जवान लक्ष्मण डोईफोडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे माता पिता आणि बंधू श्री.चंद्रकांत डोईफोडे यांनी ४३ इंची एलईडी विद्यालयास भेट दिला.
बोराटवाडी,चाकाटी,खोरोची ,रेडणी,तिरवंडी,उंबरे,या भागातील ग्रामस्थ, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वानी कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य भिमराव आवारे सर* यांनी केले.सूत्रसंचलन .अमर निलाखे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

