shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर येथे शिवजयंती उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिरचे आयोजन .

 वालचंदनगर येथे  शिवजयंती उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिरचे आयोजन .
इंदापूर प्रतिनिधी : वालचंदनगर येथे शिवजयंती उत्सवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचा संयुक्त उपक्रमाने सदरचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७ तारखेपासून विविध उपक्रम राबवून सदरची शिवजयंती उत्सव वालचंदनगर येथे साजरा करण्यात आला असे शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष  संतोष गायकवाड यांनी सांगितले. 
शिवरूप सज्जा, प्राध्यापक  भोसले सर यांचे व्याख्यान, नृत्य स्पर्धा, लहान वयोगटातील मुलांसाठी रंग भरणे स्पर्धा, रक्तदान शिबिर, शिव भोजन महाप्रसाद व डॉ. गजानन महाराज पुणे यांचा संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर विवेचन करणारे कीर्तन असे अनेक उपक्रम राबवण्यात आले.
रक्तदान शिबिरामध्ये ११६ रक्तदात्यांनी  रक्तदान केले.

 यावेळी मंडळाच्या अध्यक्ष  संतोष गायकवाड यांनी सांगितले की, राज्याचे माजी सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील , इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी देखील शिवजयंती उत्सव मंडळ उत्सवामध्ये सहभागी होऊन मंडळाचे प्रशंसा केली.
रक्तदान शिबिरास वालचंदनगरचे उपसरपंच  संजय नकाते, वालचंदनगर सहकारी बँकेचे चेअरमन  राजेंद्र रणमोडे, व्हॉइस चेअरमन सौ. राजलक्ष्मी दळवी मॅडम, माजी अध्यक्ष  दादासाहेब जगताप, श्री बर्गे , युवा उद्योजक  अमोल  बोंद्रे, सोशल मीडियाचे उपाध्यक्ष  विक्रमसिंह मोरे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  अमरसिंह निंबाळकर  अशा अनेक मान्यवरांनी भेट दिली.

शिवजयंतीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तीन दिवस सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष  संतोष गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. वालचंदनगर ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,  ग्रामपंचायत  सदस्य  व वालचंदनगर इंडस्ट्रीजचे प्रशासन यांचे देखील त्यांनी आभार मानले.
close