शंकराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने मोफत दवाखान्याच्या माध्यमातून कर्मयोगी व निराभिमा कारखान्याच्या ५६६० ऊसतोड मजुरांची व ३१६ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी - अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले
इंदापूर: कर्मयोगी कारखान्याच्या ३१५० तर निरा भिमा कारखान्याच्या २५१० एकूण ५६६० ऊसतोड मजुरांची व ३१६ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी माहिती दिली.
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर मार्फत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांच्या प्रयत्नातून आणि हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनातून कर्मयोगी शंकरराव पाटील सह. साखर कारखाना, महात्मा फुले नगर, बिजवडी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ६६ गावाच्या परिसरातील ३१५० ऊसतोड मजुरांची तसेच निरा भिमासह. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ४६ गावाच्या परिसरातील २५१० मोफत आरोग्य तपासणी व उपचार फिरत्या दवाखान्या मार्फत करण्यात आले. तसेच वेळोवेळी कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड मजुरांच्या वसाहतीमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त कर्मयोगी कारखान्यातील १२६ व निरा भिमा कारखान्यातील १३० कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करताना त्या गावाच्या परिसरातील कारखान्याचे संचालक, कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मयोगीच्या शेतकी विभागाचे कर्मचारी वर्गाचे मोठे सहकार्य लाभले, प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, टोळी मालक, शेतकरी, कारखान्यांचे सभासद, सामाजिक कार्यकर्ते, ज्ञात अज्ञात व्यक्तींचे सहकार्य प्रत्येक विभागात लाभले. त्यामुळे शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार पूर्ण क्षमतेने करता आली. या उपक्रमासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, संस्थेचे सचिव डॉ. गिरीश देसाई सर, संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर सर संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व उपक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण सर, डॉ. सारंगी कुंभार, नर्स गौरी राठोड व सानिका फुलारी, मदतनीस अख्तर शेख, रणजीत साठे, संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, जावेद हबीब अकॅडेमी प्रमुख अमोल राऊत, श्री. शिवाजीराव गोफणे तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

